Manasvi Choudhary
हिवाळ्यात थंडीपासून शरीराचे बचाव करण्यासाठी स्वयंपाकघरातील पदार्थाचा समावेश करावा.
वाढत्या थंडीत सर्दी, खोकला, डोकेदुखी आरोग्याच्या समस्या उद्भवतात.
थंडीपासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी स्वयंपाकघरातील गरम मसाल्याचे सेवन करा.
हिवाळ्यात गरम मसाला खाल्ल्याने शरीर ऊबदार राहते आणि अनेक आजारांपासून बचाव होते.
लवंगमध्ये उष्णता असते यामुळे हिवाळ्यात लवंग टाकून चहा प्यायल्यास शरीराला ऊबदारपणा येतो.
तमालपत्राचे थंडीमध्ये सेवन केल्यास शरीराला कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन ए- सी हे पोषकघटक मिळतात.
तमालपत्र उष्ण असल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करते.
काळी मिरी एक तिखट मसाला आहे काळी मिरी सर्दी, खोकला आणि फ्ल्यूसारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
हळद एक असा मसाला आहे जो आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.