Priya More
सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये डेंग्यूने कहर केला आहे. दिवसेंदिवस डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत चालली आहे.
डेंग्यू हा धोकादायक आजार आहे. डास चावल्यामुळे हा आजार होतो.
डेंग्यूच्या रुग्णांमध्ये ताप, डोकेदुखी, स्नायू दुखणे, सांधेदुखी आणि थकवा अशी लक्षणे दिसतात.
बऱ्याचदा डेंग्यूच्या रूग्णांमध्ये प्लेटलेटची संख्या कमी होते.यामुळे रक्तस्त्राव होण्याचा धोका वाढतो.
डेंग्यूच्या रुग्णांसाठी काही घरगुती उपाय आहेत.जे प्लेटलेटची संख्या वाढवण्यास मदत करू शकतात.
पपईमध्ये एंजाइम असतात जे प्लेटलेट्सचे प्रमाण वाढवू शकतात. पपईच्या पानांचा किंवा पपईच्या फळाचा रस प्यायल्याने प्लेटलेटची संख्या वाढू शकते.
डाळिंबात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट असतात. जे प्लेटलेट्सचे प्रमाण वाढवू शकतात. त्यासाठी डाळिंब खा किंवा डाळिंबाचा रस प्या..
नारळाच्या पाण्यात इलेक्ट्रोलाइट्स असतात. जे शरीराला हायड्रेट ठेवू शकतात. नारळाचे पाणी प्यायल्याने प्लेटलेटची संख्या वाढू शकते.
गिलॉयमध्ये अँटीव्हायरल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. ज्यामुळे प्लेटलेट्सची संख्या वाढू शकते. गिलॉय रस किंवा गिलॉय डेकोक्शन प्यायल्याने प्लेटलेटची संख्या वाढू शकते.
काजूमध्ये प्रोटीन आणि लोह असते. त्यामुळे काजू खाल्ल्याने प्लेटलेट्सची संख्या वाढू शकते.