Manasvi Choudhary
सकाळी उठल्या उठल्या उपाशीपोटी आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे.
उपाशीपोटी काही पदार्थ खाण्याचे जसे फायदे आहेत तसे तोटेदेखील आहेत.
उपाशीपोटी काहीही न खाता टोमॅटो खाल्यामुळे अॅसिडीटी होण्याची शक्यता असते. त्यामुळे छातीत जळजळणे, छातीत दुखणे किंवा पोटदुखी सारखा संभवतो.
केळी आरोग्यासाठी उत्तम मानली जातात. परंतु, त्यात मोठ्या प्रमाणावर मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअम असतात. त्यामुळे रिकाम्या पोटी केळी कधीच खाऊ नये.
रिकाम्या पोटी केळी खाल्ल्यामुळे अनेकदा उलटी होणे, मळमळणे असा त्रास होतो.
उन्हाळ्यात दही खाण्याचा अनेकदा सल्ला दिला जातो. मात्र, रिकाम्यापोटी दही खाल्ल्यामुळे पोटात कळ येते.