ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
स्वयंपाकघरात अशा अनेक गोष्टी असतात, ज्याचा आपण चवीनुसार वापर करतो. पण त्यांच्या सेवनाने आजारांचा धोका वाढू शकतो.
पदार्थांमध्ये गोडपणा येण्यासाठी साखरेचा वापर केला जातो. याचे जास्त सेवन केल्याने रक्तदाब, मधुमेह आणि फॅटी लिव्हरची समस्या उद्भवते.
अनेक बेकरी वस्तू मैद्यापासून बनवल्या जातात. त्यांचे सतत सेवन केल्याने वजन वाढण्यासोबत हृदयविकार आणि कर्करोगाचा धोका वाढतो.
जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने हृदयविकार आणि पक्षाघात होतो.
जास्त तेल वापर मधुमेह, हृदयविकाराचा झटका, कर्करोग आणि सांधे दुखी यांच्याशी संबंधित आहे.