Shruti Vilas Kadam
हाडे आणि स्नायूंना जोडणाऱ्या टेंडनमध्ये सूज आणि वेदना निर्माण झाल्यास त्याला टेंडिनायटिस म्हणतात. हात, खांदा, मनगट, गुडघा अशा विविध भागांमध्ये हा त्रास होऊ शकतो.
हात वर करताना, गुडघा वाकवताना किंवा मनगट फिरवताना तीव्र वेदना जाणवणे हे टेंडिनायटिसचे प्रमुख लक्षण असू शकते. दुखत असलेल्या भागावर दाब दिल्यावरही वेदना होऊ शकतात.
झोपेतून उठल्यानंतर संबंधित भाग किंवा सांधा कडक, जड किंवा ‘जाम’ झाल्यासारखा वाटू शकतो. हालचाल सुरू केल्यानंतरही त्रास जाणवू शकतो.
एखादीच हालचाल सतत करणे, अचानक वजन उचलणे किंवा शरीराची चुकीची पोझिशन ठेवणे यामुळे टेंडनवर वारंवार ताण येतो आणि टेंडिनायटिसचा धोका वाढू शकतो. वय वाढणेही एक कारण असू शकते.
वेदना वाढवणारी हालचाल किंवा काम काही काळ थांबवून संबंधित भागाला आराम देणे महत्त्वाचे आहे. सुरुवातीच्या त्रासाकडे दुर्लक्ष न करता योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.
सुरुवातीच्या वेदना आणि सूजेसाठी Rest, Ice, Compression आणि Elevation म्हणजेच आराम, बर्फाची शेक, हलकी पट्टी आणि दुखरा भाग उंच ठेवण्याची पद्धत वापरली जाते. बर्फ थेट त्वचेवर लावू नये.
टेंडिनायटिसचा उपचार परिस्थितीनुसार आराम, फिजिओथेरपी आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधांनी केला जाऊ शकतो. वेदना सतत राहिल्यास स्वतःहून उपचार करण्याऐवजी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्या.