Chetan Bodke
उन्हाळ्याच्या दिवसांत कलिंगडाचे सेवन केल्याने शरीरासाठी उत्तम असते. कलिंगडाचे सेवन केल्यामुळे आपली बॉडी थंड राहते.
तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर उन्हाळ्यामध्ये कलिंगडचे सेवन करून वजन कमी करू शकता.
टरबूजमध्ये पुरेशा प्रमाणात फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, ए आणि बी आहे. यामुळे आपली तब्येत नियंत्रणात राहते.
कलिंगडामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असले तरीही त्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण नियंत्रणात असते. त्यामुळे आपलं पोट भरलेलं राहतं आणि वजन नियंत्रणात राहते
कलिंगडमध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे शरीर हायड्रेट राहते. व्यायाम केल्यानंतर कलिंगडचे सेवन करावे.
कलिंगडमध्ये व्हिटामिन सी असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. त्यासोबतच लायकोपीन घटकामुळे मधुमेह आणि हृदयविकारांचा धोका कमी होतो.
ज्यावेळी तुम्ही कलिंगडचे सेवन करता त्यावेळी अन्य गोष्टी सुद्धा मिक्स करून खाऊ शकता. पण सर्व आहारातील मुख्य घटक हे कलिंगडच असायला हवे.
कलिंगडमध्ये फायबरची मात्रा जास्त असते. सोबतच, कोलेस्ट्रॉल देखील कमी असते. शरीरातील पोषक घटक अतिरिक्त चरबी घटवतात. ज्यामुळे वजन कमी होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या डॉक्टरांसोबत संपर्क साधा.