Manasvi Choudhary
अनेकांना दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर बडीशेप खाण्याची सवय असते. बडीशेप खाल्ल्यामुळे आपल्या आरोग्याला बरेच गुणकारी फायदे आहेत.
हार्ट अटॅकची समस्या दूर
बडीशेपचे सेवन केल्यामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोक सारख्या गंभीर आजारांपासून आपला बचाव होतो.
बडीशेपमध्ये जास्त प्रमाणात पॉटेशियम असते. त्यामुळे शरीरातील फोलेटचे प्रमाण कमी करते आणि हाय ब्लड प्रेशर प्रमाणात ठेवते.
बडीशेपचे प्रमाणात सेवन केल्यामुळे, त्यातील व्हिटामिन सी शरीरातील फ्री रेडीकल्सला प्रतिबंध करते आणि हृदय निरोगी ठेवते.
महिलांनी मासिक पाळीच्या काळामध्ये बडीशेपचे सेवन केल्यामुळे होणाऱ्या वेदनेपासून आराम मिळु शकतो.
जेवण केल्यानंतर अनेकांच्या तोंडाला घाण वास येतो. त्यामुळे आपण बडीशेपचा मुखवास म्हणूनही वापर करु शकतो.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी आपल्या डॉक्टरांसोबत संपर्क साधावा.