Ankush Dhavre
मका खायला सर्वांनाच आवडतं
पावसाळयात फिरण्याच्या ठिकाणी किंवा हिरव्यागार डोंगरावर जाऊन मका खाण्याची मजा काही औरच आहे.
मका हा आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतो. पण त्याचे फायदे काय आहेत हे खूप कमी लोकांना माहीत आहे.
मक्याची पोळी खाल्ल्याने कॉलेस्ट्रॉल कमी होतं. त्यामुळे कार्डियोव्हॅस्क्युलरचा धोकाही कमी होत असतो.
मक्याच्या पिठात बिटा कॅरटीन नावाचं तत्व असतं. जे रेड ब्लड सेल्सच्या निर्मितीत मदत करते.
मक्याचे कनिस खाल्ल्याने दात मजबुत होण्यास मदत होते.
मक्यामध्ये पित्त आणि वात कमी करण्याचे गुणधर्म असतात. मक्याचे दाणे उकळत्या पाण्यात मीठ आणि हळद घालून शिजवून खाल्ल्यास नक्कीच फायदा होतो.
मक्का खाल्ल्याने कॉलेस्ट्रॉल नियंत्रित राहते.