ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उन्हाळ्यात माठातून पाणी पिणे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले गेले आहे.
मातीच्या भांडयातील थंड पाणी पिण्यामुळे सर्दी,खोकला, घशाचे इनफेक्शन, ताप असे विकार होत नाहीत.
उन्हाळ्यात मातीच्या भांड्यातील पाण्याने तुमची तहान लवकर भागते.
मात्र फ्रिजमधील पाणी वारंवार प्यावेसे वाटते. माठातील पाणी पिण्याने डिहायड्रेशनचा त्रास होत नाही.
मातीच्या भांड्यातील पाणी अल्काईनयुक्त असते. ज्यामुळे शरीरप्रकृती उत्तम राहण्यास मदत होते.
मातीच्या भांड्यातील पाण्यामुळे अॅसिडिटीचा त्रास कमी होतो.
माठाच्या पाण्यामुळे शरीराला अनेक खनिजे, जीवनसत्त्वे मिळतात
माठातील पाण्यामुळे उष्माघातापासून संरक्षण होते.