Manasvi Choudhary
हिवाळ्यात अनेक फळे बाजारात उपलब्ध असतात. त्यातील एक म्हणजे पेरु.
पेरु खाण्यासाठी अत्यंत स्वादिष्ट फळ आहे. याशिवाय पेरु आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.
पेरुमध्ये जास्त प्रमाणात फायबर असते. त्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते.
पेरुमध्ये विटामिन सी असते. त्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते.
पेरुमध्ये अँटीऑक्सिडंट्स, बीटा कऍरोटीन आणि लाइकोपीन असते. त्यामुळे त्वचा खूप सुंदर आणि तजेलदार राहते.
पेरुमध्ये जास्त प्रमाणात पाणी, फायबर असते. त्यामुळे वजन कमी करण्यात पेरु उपयुक्त ठरतो.
पेरुमध्ये पॉटेशियम खूप जास्त प्रमाणात असते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य वैद्यकीय सल्ला घ्या