Shraddha Thik
झोपताना तुमच्या आजूबाजूला ठेवलेल्या वस्तूंचा तुमच्या आरोग्यावर आणि झोपेवरही परिणाम होतो.
झोपताना अनेकजण आपला फोन उशीखाली ठेवतात, पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की उशीखाली फोन ठेवून झोपल्यास काय होते?
मोबाईल फोन उशीखाली ठेवून झोपणे धोकादायक तर आहेच पण त्यामुळे तुमची झोपही बिघडते असे अनेक संशोधकांचे म्हणणे आहे. जागतिक आरोग्य संघटनेने 2011 मध्ये याबाबत एक अहवाल सादर केला होता.
मोबाईल फोनमधून निघणारा निळा प्रकाश मेलाटोनिनच्या उत्पादनात व्यत्यय आणू शकतो. यामुळे तुमची झोप कमी होऊ शकते.
काही अभ्यासातून असे दिसून आले आहे की मोबाइल फोन रेडिओफ्रिक्वेंसी रेडिएशन उत्सर्जित करतात, ज्याच्या संपर्कात आल्याने अनेक प्रकारच्या कर्करोगाचा धोका वाढतो.
मोबाईल फोनमधून उत्सर्जित होणाऱ्या रेडिओ फ्रिक्वेन्सी रेडिएशनच्या संपर्कात आल्याने पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या कमी होते, असेही अभ्यासातून दिसून आले आहे. अशा परिस्थितीत, मोबाईल आपल्या आजूबाजूला किंवा उशीखाली ठेवून झोपणे टाळा.
मोबाईलद्वारे तयार होणाऱ्या उष्णतेमुळे किंवा रेडिओफ्रिक्वेंसी रेडिएशनच्या संपर्कात आल्याने डोकेदुखी होणे देखील सामान्य आहे.