Manasvi Choudhary
भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला हरतालिकेचा उपवास केला जातो.
यावर्षी १८ सप्टेंबर रोजी हरितालिका साजरी केली जाणार आहे.
हरतालिकेच्या दिवशी विवाहित महिला आणि कुमारिका मुली उपवासाचे व्रत करतात.
हरितालिकेचा व्रत विवाहित महिलेने केल्याने पतीला दिर्घायुष्य लाभते. तसंच वैवाहिक जीवनात सुख- समृद्धी येते असे मानले जाते.
पौराणिक कथेनुसार, माता पार्वतीने हे व्रत भगवान शंकराला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी केले होते.
हरितालिकेच्या दिवशी विधिवत भगवान शंकराची आणि माता पार्वतीची पूजा करावी.
या दिवशी संपूर्ण दिवसभर विवाहित महिला आणि मुली न खाता, पिता कडक उपवास करतात.
हरितालिकेच्या दिवशी निर्जळी उपवास करणाऱ्या महिलांनी चुकूनही पाणी किंवा अन्न खाऊ नये
हरतालिकेचा उपवासाला फलाहार करणे योग्य आहे.
हरतालिकेच्या व्रताला शिजवलेला अथवा भाजलेला कोणताही पदार्थ खात नाहीत.