Manasvi Choudhary
हरतालिका तीज हा सण भगवान शंकर आणि माता पार्वती यांना समर्पित आहे.
भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षातील तृतीयेला हरतालिका साजरी करण्याची पूर्वीपासूनची परंपरा आहे.
यावर्षी १८ सप्टेंबर २०२३ म्हणजेच येत्या सोमवारी हरतालिका साजरी होणार आहे
विवाहित महिला पतीच्या दिर्घायुष्यासाठी तर कुमारिका चांगला पती मिळावा यासाठी हरतालिकेचे व्रत करतात.
नवरात्रीप्रमाणेच हरतालिका पूजा करताना रंगाना विशेष महत्व आहे.
शास्त्रात हरतालिकेची पूजा करताना स्त्रियांनी कोणते कपडे परिधान करावे याबाबत सांगितले आहे.
हरतालिकेच्या दिवशी पूजा करताना स्त्रियांनी स्नान करून नवीन वस्त्र परिधान करावे
हरतालिका पूजेत काळे वस्त्र अशुभ मानले जाते. यामुळे पूजा करताना स्त्रियांनी काळे वस्त्र परिधान करू नये
हरतालिकेचे व्रत करणाऱ्या स्त्रिया आणि मुलींनी हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करावे.