कोमल दामुद्रे
भारतीय क्रिकेट संघाचा अभिमान असलेला विराट कोहली आज त्याचा ३४ वा वाढदिवस साजरा करत आहे.
विराट कोहलीचा जन्म ५ नोव्हेंबर १९८८ रोजी झाला. आज तो जगातील महान क्रिकेटपटूंपैकी एक मानला जातो.
विराट कोहली हे भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आणि भारतीय राष्ट्रीय संघाचा कर्णधार आहे.
उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या कोहलीचा अनेकवेळा जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून उल्लेख केला गेला आहे.
इंडियन प्रीमियर लीगच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाकडून तो खेळतो आणि २०१३ पासून संघाचा कर्णधार आहेत.
कोहलीचे नाव इएसपीएन(ESPN) च्या जगातील सर्वात जास्त विख्यात अॅथलीट्सच्या यादीत आठव्या क्रमांकावर आहे.
२००८ साली मलेशियामध्ये झालेल्या अंडर १९ वयोगटातील विश्वचषकासाठी खेळविल्या गेलेल्या सामन्यांमध्ये विजेत्या संघाचे कर्णधारपद त्याच्याकडे होते.
त्यानंतर त्यांने एकदिवसीय सामन्यात प्रवेश केला. २०११ मध्ये वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय संघातही त्याचा समावेश होता.
त्याने २०११ मध्ये पहिला कसोटी सामना वेस्ट इंडीज विरुद्ध खेळला. २०-२० क्रिकेट विश्वचषक, २०१४ मध्ये मालिकावीराचा पुरस्कार मिळवित त्याने क्रिकेट प्रकारातही आपले वर्चस्व सिद्ध केले.
त्याच्या स्टायलिश फलंदाजीमुळे तो 'किंग कोहली' आणि 'रन मशीन' अशा नावांनी ओळखला जातो.
देवधर ट्रॉफी फायनलमध्ये कर्णधार असलेला विराट कोहली हा दुसरा सर्वात तरुण खेळाडू आहे. 2009-10 मध्ये देवधर ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात त्याने कर्णधारपद भूषवले होते. यावेळी त्यांचे वय अवघे २१ वर्षे होते.
2019 मध्ये एका दशकात 20,000 आंतरराष्ट्रीय धावा करणारा किंग कोहली हा एकमेव फलंदाज आहे.
कोहली एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 10,000 धावा करणारा फलंदाज आहे. 2018 मध्ये त्याने हा विक्रम आपल्या नावावर केला.
आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रमही कोहलीच्या नावावर आहे. आरसीबीचा कर्णधार म्हणून त्याने 2016 मध्ये 4 शतके झळकावली होती.
कर्णधार म्हणून 150+ धावा करण्याचा विक्रमही कोहलीच्या नावावर आहे.
बॉलिवूडची अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत २०१७ मध्ये विराट कोहलीने लग्न गाठ बांधली व सध्या त्याला एक मुलगी देखील आहे.