Manasvi Choudhary
श्वेता तिवारीचा जन्म 4 ऑक्टोबर 1980 रोजी उत्तरप्रदेशमध्ये झाला.
श्वेता तिवारीचे वडील कवी होते. तर आई गृहिणी होती.
टेलिव्हिजन इंडस्ट्रीत येण्यापूर्वी श्वेता तिवारी 'सहारा वन स परिवार'चा भाग होती, 2001 मध्ये श्वेताने ब्रेक घेतला
श्वेताला एकता कपूरच्या 'कसौटी जिंदगी की' या मालिकेमुळे प्रसिद्ध मिळाली.
श्वेता तिवारीने 'नच बलिए 2', 'बिग बॉस 4' आणि 'कॉमेडी सर्कस का नया दौर' यासह विविध रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता.
श्वेताच्या वैवाहिक आयुष्यात अनेक चढ- उतार आले. श्वेताचं पहिलं लग्न राजा चौधरीसोबत झालं. २००७ मध्ये या दोघांचाही घटस्फोट झाला
2013 मध्ये श्वेताने अभिनेता अभिनव कोहलीसोबत दुसरं लग्न केलं. पण यातही तिला यश आले नाही. दोघांचा घटस्फोट झाला असून त्यांना रेयांश नावाचा मुलगा आहे.
श्वेताने 2004 मध्ये 'मधोशी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिच्यासोबत बिपाशा बसू आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत होते.
श्वेताला 'इंडियन टेली अवॉर्ड', 'इंडियन टेलिव्हिजन अकादमी अवॉर्ड' आणि 'कलाकर अवॉर्ड' मिळाले आहेत.
अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.
श्वेता फिट राहण्यासाठी पौष्टिक आहार घेते. व्यायाम करण्यास प्राधान्य देते