कोमल दामुद्रे
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर शेन वॉर्न हे सर्वाधिक विकेटचे विक्रमी होते. १३ सप्टेंबर १९६८ रोजी अपर फन्ट्री गली, व्हिक्टोरीया, ऑस्ट्रेलिया येथे यांचा जन्म झाला.
वॉर्न हे व्हिक्टोरीया, ऑस्ट्रेलियासाठी राईट हॅन्ड लेग स्पिन बॉलर व राईट हॅन्ड बॅट्समॅन म्हणून खेळत होते.
वनडेमध्ये वार्नच्या नावावर १९४ सामने खेळून २९३ विकेट्सचा विक्रम त्यांनी आपल्या नावे केला.
श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनंतर वनडे कसोटीत १००० बळी घेणारा वॉर्न हा दुसरा गोलंदाज ठरला.
फलंदाजीत वॉर्नच्या नावे १३ आतंरराष्ट्रीय अर्धशतके आहेत.
वॉर्नने २००८ मध्ये राजस्थान रॉयल्सला विजेतेपद मिळवून दिल्यानंतर पहिले इंडियन प्रीमियर लीग (IPL) चे विजेते कर्णधार बनले.
वॉर्न हे ऑस्ट्रेलियाच्या १९९९ च्या विश्वचषक विजेत्या संघाचा अविभाज्य भाग होते.
१९९३ मध्ये त्याने इंग्लंडचा फलंदाज माईक गॅटिंगला बाद करण्यासाठी 'बॉल ऑफ द सेंच्युरी' ची निर्मिती केली होती.