Vishal Gangurde
प्राजक्ता माळी ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
प्राजक्ताने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात मनात एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे.
मराठमोळ्या प्राजक्ताचा आज वाढदिवस आहे.
`महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामुळे प्राजक्ता महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली.
`महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामधील प्राजक्ताचं सूत्रसंचालन प्रेक्षकांना खूप पसंत पडलं.
प्राजक्ताने काही महिन्यांपूर्वी एका मुलाखतीत `महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामधील आवडत्या कलाकाराविषयी भाष्य केलं होतं.
`महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामधील समीर चौघुले हा प्राजक्ताचा आवडता कलाकार आहे.
'तो मराठीतील चार्ली चॅप्लिन वाटतो, असे एका मुलाखतीत प्राजक्ताने सांगितले होते.