साम टिव्ही ब्युरो
अभिनेता स्वप्नील जोशी ४६वा आज वाढदिवस साजरा करत आहे.
स्वप्नील जोशीचा जन्म १८ ऑक्टोबर १९७७ मध्ये मुंबईत झाला आहे.
लहानपणापासूनच अभिनयाची आवड असणाऱ्या स्वप्निलने मनोरंजन विश्वात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.
केवळ मराठीतच नाही तर हिदींतही स्वप्नीलच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
मराठी चित्रपटसृष्टीत 'चॉकलेट बॉय' म्हणून स्वप्निल जोशीचं नाव घेतलं जातं.
सोशल मीडियावर स्वप्नीलचा मोठा चाहतावर्ग आहे.
स्वप्नीलचे 'दुनियादारी', 'मुंबई-पुणे-मुंबई', पक पक पकाक, व्हेंटिलेटर, शाळा असे अनेक सिनेमे सुपरहिट ठरले आहेत.