Manasvi Choudhary
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आज ११ ऑक्टोबर २०२३ रोजी त्यांचा ८० वा वाढदिवस साजरा करत आहे.
बॉलिवूडचे 'महानायक' अशी अमिताभ बच्चन यांची ओळख आहे.
गेली 5 दशके बॉलिवूड इंडस्ट्रीवर राज्य करणारे अमिताभ बच्चन आजही तितकेच सक्रिय आहेत.
अमिताभ बच्चन यांचा जन्म ११ ऑक्टोबर १९४२ मध्ये उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे झाला
अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंशराय बच्चन प्रसिद्ध कवी होते. तर आई तेजी बच्चन गृहिणी होत्या.
अमिताभ बच्चन यांनी १९६९ मध्ये फिल्मी करिअरला सुरूवात केली
'सात हिंदुस्तानी' या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिथून सुरू झालेला त्यांचा प्रवास आजही तसाच सुरू आहे.
बिग बींचा फिल्मी प्रवास खडतर होता. सुरूवातील बिग बींना त्यांच्या उंचीवरून बोलले जात होते.
२०० पेक्षा अधिक चित्रपटात बिग बींनी काम केले. मात्र काहीच चित्रपटात त्यांना यश आले
अमिताभ बच्चन यांच्या 'जंजीर' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील यशाचे यापूर्वीचे सर्व विक्रम मोडीत काढले. या चित्रपटामुळे त्यांचे आयुष्यचं बदलले.