Manasvi Choudhary
सध्या थंडी खूप जास्त वाढली आहे. अनेक ठिकाणी अतिथंडीमुळे आरोग्यावर परिणाम होत आहे. अतिथंडी पडली की हात- पाय थंड पडणे, हाता- पायाला सुज येणे अशा समस्या उद्भवतात.
थंडी तुम्हाला जास्त जाणवत असेल तर गरम पाणी किंवा गरमा गरम चहा प्या आराम वाटेल. थंडीत गरमा गरम पदार्थ खाल्ल्याने शरीराला ऊब मिळते.
मोहरीचे तेल आणि लसूण हात-पायांना लावल्याने थंडीपासून आराम मिळतो. हात आणि पायांच्या बोटांना हे तेल लावल्याने कोरडेपणा दूर होतो.
थंडीमुळे हात पाय थरथर कापत असतील तर तुम्ही नखं आणि बोटाची टोके घासून थंडीपासून बचाव करू शकता. हात आणि पायात मोजे घाला यामुळे शरीराला ऊब मिळेल.
शरीरात पाण्याची कमतरता असल्यास हात आणि पाय थरथर कापतात. स्वत: ला डिहायड्रेट ठेवण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्या.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.