Shraddha Thik
आपल्या केसांचे सौंदर्य टिकवण्यासाठी आपण दिवसातून अनेक वेळा केस विंचरतो. तसेच केस विंचरल्याने चांगले दिसता.
पण तुम्हाला माहित आहे का की तुम्ही केसांना वारंवार विंचरल्याने तुमच्या केसांचे नुकसान होऊ शकते. त्याबद्दल जाणून घेऊया.
केस जास्त विंचरल्याने केस कमकुवत होऊ लागतात. त्यामूळे केस हळूहळू तुटू लागतात.
केस कमकुवत होण्यापासून रोखायचे असेल तर वारंवार कंगवा करणे टाळा. याशिवाय केस धुतल्यानंतरही केस विंतरू नका.
जास्त विंचरल्याने तुम्हाला केस गळण्याची समस्या भेडसावू शकते कारण तुम्ही जितक्या वेळा विंचराल तितके केस कंगव्यामध्ये दिसतील.
दुसरीकडे, केसांना वारंवार विंचरल्यास केसांची वाढ थांबते.
जेव्हा तुम्ही तुमचे केस वारंवार आणि खूप वेगाने विंचरता तेव्हा ते टाळूचे नुकसान करते आणि टाळूमध्ये वेदना देखील होऊ शकते.