Shruti Vilas Kadam
केसांना सीरम लावल्याने केसांचा कोरडेपणा आणि उडणारे केस (फ्रिझ) कमी होतात. केस अधिक मऊ आणि व्यवस्थित दिसू लागतात.
सीरममुळे केसांवर एक हलका संरक्षणात्मक थर तयार होतो, यामुळे केस चमकदार आणि हेल्दी दिसतात.
केस विंचरणं, ब्लो-ड्राय किंवा स्ट्रेटनिंग करताना सीरममुळे केस गुंतत नाहीत आणि स्टायलिंग सहज होते.
हेअर ड्रायर, स्ट्रेटनर किंवा कर्लर वापरण्यापूर्वी सीरम लावल्यास उष्णतेमुळे होणारे नुकसान कमी होते.
दुभंगलेली टोकं (स्प्लिट एंड्स) कमी दिसावीत यासाठी सीरम उपयोगी ठरते आणि केस तुटण्यापासून वाचतात.
सीरम केसांतील नैसर्गिक ओलावा लॉक करून ठेवते, त्यामुळे केस कोरडे न होता मऊ राहतात.
दररोज थोडंसं सीरम लावल्यास केस अधिक नीटस, शिस्तबद्ध आणि आकर्षक दिसतात.