Chetan Bodke
कायमच महिलावर्ग आपल्या केसांची निगा राखण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करतात.
वाढलेली केस गळती, केस पांढरे होणे आणि केसामध्ये कोंडा होणे अशा इत्यादी प्रकारामुळे सर्वच त्रासलेले आहेत. या सर्वांवर उत्तम उपाय म्हणजे जास्वंदाचं फूल.
खरंतर जास्वंदाचं फूलं हे आपण नेहमीच गणपतीसमोर ठेवत असतो. पण ह्याच फूलाचा वापर आपल्याला दैनंदिन आयुष्यातही करता येवू शकतो.
जास्वंदाचे तेल आपल्या केसांना लावल्यास केस अधिक चमकदार होतील.
जास्वंदाच्या तेलाने केसांची मालिश केल्यामुळे केस अधिक मजबूत होतात. सोबतच केस गळण्याची समस्या नाहीशी होते.
जर केसं खूपच कोरडे असतील आणि केसांची व्यवस्थित वाढ होत नसेल, तर तुम्ही जास्वंदाच्या तेलाचा वापर करु शकतात.
त्यासोबतच जास्वंदाची फुलं बारीक करून त्याची पेस्ट बनवून केसांना लावा नंतर केस व्यवस्थित धुवा. यामुळे काही दिवसांतच केस मऊ आणि चमकदार दिसू लागतील.
जास्वंदीच्या तेलामुळे केस चमकतील आणि केस अधिकच सुंदर दिसतील.
हा लेख फक्त माहितीसाठी आहे. आपल्या केसांसाठी डॉक्टरांकडून किंवा ब्युटी तज्ज्ञांकडून योग्य सल्ला घ्यावा.