साम टिव्ही ब्युरो
प्रत्येक स्त्री ही सुदंर दिसते मात्र तिच्या सौंदर्यात विशेषत: महत्व असते ते म्हणजे काळ्याभोर केसांना.
लांब केस आणि केसांची चमक हे स्त्रीचे सौंदर्य फुलवते.
लांब केस आणि केसांची चमक वाढवण्यासाठी घरगुती उपाय
केसांची नियमित मालिश केल्याने केसांना पूरक असे पोषण मिळते.
मालिश केल्याने स्कॅल्पला पुरेसा रक्तपुरवठा होतो.
कोंड्याची समस्या असेल तर एलोवेरा जेल खूप फायदेशीर आहे.
एलोवेरा जेल केसांना चमक देईल. हे जेल केसांच्या मुळापासून केसांच्या लांबीपर्यंत लावावे.
मध हे नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. जे तुमच्या केसांना चमकदार बनवेल.
नैसर्गिक मध हे कोरड्या केसांसाठी हे खूप फायदेशीर आहे.
खोबरेल तेलात लिंबाचा रस मिसळून केसांना लावावा. असे केल्याने केसांमध्ये चमक येण्यासोबतच कोंड्याची समस्याही कमी होते.