Shruti Vilas Kadam
२ ते ३ चमचे खोबरेल तेल घ्या आणि ते हलके कोमट करा. तेल खूप गरम करू नका.
तेल थोडे कोमट झाल्यावर त्यात १ व्हिटॅमिन ‘ई’ कॅप्सूलमधील तेल मिसळा. दोन्ही पदार्थ व्यवस्थित एकत्र करा.
बोटांच्या टोकांनी केसांच्या मुळांवर आणि टाळूवर ५ ते १० मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. नखांचा वापर करू नका.
उरलेले मिश्रण केसांच्या लांबीवर आणि टोकांवर लावा. यामुळे कोरडेपणा कमी होण्यास आणि केस मऊ राहण्यास मदत होऊ शकते.
तेल लावल्यानंतर साधारण ३० मिनिटे ते १ तास केसांवर ठेवू शकता. त्यानंतर सौम्य शॅम्पूने केस धुवा.
खोबरेल तेल केसांना मॉइश्चर देण्यास आणि प्रोटीन लॉस कमी करण्यास मदत करू शकते. त्यामुळे कोरडे आणि रफ केस मऊ वाटू शकतात. व्हिटॅमिन ‘ई’मध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात.
व्हिटॅमिन ‘ई’ तेलकट असल्याने काही जणांच्या त्वचेवर खाज, लालसरपणा किंवा जळजळ होऊ शकते. त्यामुळे आधी छोट्या भागावर पॅच टेस्ट करा. केसगळती जास्त असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या.