Shruti Vilas Kadam
प्रदूषण, उष्णता, हवामानातील बदल आणि सतत स्टायलिंगमुळे केसांचा नैसर्गिक ओलावा कमी होऊन ते कोरडे व निस्तेज दिसू शकतात.
योग्य हेअर मास्क केसांना अतिरिक्त मॉइश्चर देऊन त्यांचा कोरडेपणा आणि रफनेस कमी करण्यास मदत करू शकतो.
अर्धा कप दह्यात १ चमचा मध मिसळून तयार केलेला मास्क केसांवर लावू शकता. दही मॉइश्चर देण्यास, तर मध ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करतो.
तयार केलेला मास्क विशेषतः केसांच्या लांबीपासून टोकांपर्यंत लावा. टाळूची समस्या किंवा संवेदनशीलता असल्यास थेट स्कॅल्पवर प्रयोग करण्यापूर्वी पॅच टेस्ट करणे योग्य.
DIY हेअर मास्क जास्त वेळ ठेवण्याची गरज नाही. साधारण २० ते ३० मिनिटांनंतर केस व्यवस्थित धुवावेत.
नियमित आणि योग्य वापरामुळे केसांची टेक्स्चर, मऊपणा आणि चमक सुधारण्यास मदत होऊ शकते.
केसांच्या गरजेनुसार आठवड्यातून एकदा किंवा दोनदा हेअर मास्क वापरता येतो. मात्र केस खूप खराब किंवा तुटत असतील तर तज्ज्ञांचा सल्ला घेणे चांगले.