Shruti Vilas Kadam
मेथीतील प्रथिने व लोखंडी कढईतून मिळणारे आयर्न केसांच्या मुळांना बळकटी देऊन केसगळती कमी करतात.
मोहरीच्या तेलातील ओमेगा फॅटी अॅसिड्स आणि मेथीतील पोषक घटक केसांच्या वाढीस चालना देतात.
या तेलातील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म टाळू स्वच्छ ठेवून कोंड्याची समस्या कमी करतात.
नियमित वापराने केसांना नैसर्गिक पोषण मिळते व ते अधिक चमकदार दिसतात.
लोखंडी कढईत तयार केल्यामुळे तेलात आयर्न मिसळते, जे अकाली पांढरे केस येण्यास आळा घालण्यास मदत करते.
मोहरीच्या तेलाची उष्ण प्रवृत्ती टाळूतील रक्ताभिसरण वाढवते, त्यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळते.
मेथीचे दाणे (२–३ टेबलस्पून), मोहरीचे तेल (१ कप), लोखंडी कढई आणि गाळणी घ्या. कढई गरम करा त्यात मेथीचे दाणे टाका आणि मंद आचेवर हलके भाजा. भाजलेल्या मेथीवर हळूहळू मोहरीचे तेल ओता. मंद आचेवर ५–७ मिनिटे उकळू द्या. तेल गाळून काचेच्या बाटलीत साठवा. आठवड्यातून २–३ वेळा वापरा.