Shruti Vilas Kadam
तुमचे केस ड्राय, ऑयली, नॉर्मल की डॅमेज्ड आहेत हे आधी ठरवा. केसांच्या प्रकारानुसार शॅम्पू निवडल्यास योग्य निगा मिळते.
ही रसायने केसांमधील नैसर्गिक नमी कमी करतात आणि स्कॅल्पला कोरडे बनवू शकतात. त्यामुळे ‘सल्फेट-फ्री’ आणि ‘पॅराबेन-फ्री’ शॅम्पू निवडा.
पॅकवर “नैसर्गिक” लिहिलेले असले तरी लेबल नीट वाचा. कधी काही हानिकारक केमिकल्स लपलेले असू शकतात.
केस झडत असतील, फ्रिझी असतील, डँड्रफ असेल किंवा व्हॉल्यूम कमी असेल, तर त्या समस्येप्रमाणे स्पेशल फॉर्म्युला असलेले शॅम्पू निवडा.
शॅम्पूचा pH 5 ते 7 च्या दरम्यान असणे उत्तम. त्यामुळे स्कॅल्पचे नैसर्गिक संतुलन टिकून राहते.
“क्लिनिकली टेस्टेड”, “डॉक्टर-अप्रूव्ड” अशा दाव्यांवर लगेच विश्वास ठेवू नका. रिव्यू वाचा, प्रॉडक्टची माहिती तपासा.
अतिशय प्रखर सुगंध असलेले शॅम्पू स्कॅल्पला इरिटेशन देऊ शकतात. हलका सुगंध आणि सौम्य टेक्सचर असलेला शॅम्पू अधिक सुरक्षित असतो.