Shraddha Thik
खराब जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे केस पांढरे होण्याची समस्या तरुणांमध्येही दिसून येत आहे.
लोक 40 किंवा 50 वर्षांचे वय ओलांडल्यानंतर केसांचा रंग पांढरा व्हायचा. पण आता ही समस्या 20 ते 25 वयोगटातील तरुणांमध्येही दिसून येत आहे.
लहान वयात केस पांढरे होणे म्हणजे शरीरात नक्कीच काही समस्या आहे.
ताणतणाव, अनुवांशिक कारणे, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी तसेच अनियमित जीवनशैली ही केस पांढरे होण्याची कारणे आहेत.
याशिवाय हेअर स्टाइलिंग उत्पादने, रंग, स्प्रे आणि जेलमध्ये असलेली हानिकारक रसायने कारणीभूत ठरू शकतात.
सर्वप्रथम तुमच्या आहारात तांबे, सेलेनियम, लोह, कॅल्शियम, फॉलिक अॅसिड आणि व्हिटॅमिन बी12 असलेले पदार्थ खावेत. तणाव कमी करून पुरेशी झोप घेतली पाहिजे. तुम्ही जास्त केस स्टाइलिंग उत्पादने वापरू नयेत.
आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जर एखाद्याचे केस अनुवांशिकदृष्ट्या पांढरे असतील तर ते नैसर्गिकरित्या पुन्हा काळे करणे अशक्य आहे. तथापि, उर्वरित केस अकाली पांढरे होणे टाळता येऊ शकते.