Shruti Vilas Kadam
ब्लॅक टीमध्ये नैसर्गिक रंगद्रव्ये असतात, जी केसांना गडद छटा देतात आणि नैसर्गिक चमक वाढवतात.
चहा पत्तीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स व कॅफिन केसांची मुळे मजबूत करतात आणि केस गळती कमी करतात.
ब्लॅक टीमध्ये अँटीबॅक्टेरियल व अँटीफंगल गुणधर्म असतात, जे डोक्याच्या त्वचेला स्वच्छ ठेवतात व डँड्रफपासून संरक्षण करतात.
चहा पाण्याने केस धुतल्यास ते अधिक मऊ, गुळगुळीत आणि व्यवस्थीत वाटू लागतात.
ब्लॅक टीने केसांना पोषण मिळते, ज्यामुळे कोरडे आणि निर्जीव दिसणारे केस पुन्हा उजळून दिसतात.
कॅफिनयुक्त चहा पाणी केसांच्या वाढीला चालना देऊ शकते, कारण हे रक्तप्रवाह सुधारण्यास मदत करते.
टी वॉटर हे नैसर्गिक आणि सुलभ घरगुती उपाय आहे, जो कोणत्याही रसायनाशिवाय केसांची निगा राखतो.