ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सध्या तरुणींना साड्या नेसायला आणि सोशल मीडियावर त्यांच्या सुदंर पोस्ट शेअर करायला प्रचंड आवडायला लागलय.
सोशल मीडियावर तरुणी नेहमीच ट्रेंड शेअर करत असतात. त्यामध्ये सध्या हत्ती झुमक्याचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे.
तुम्हीही झुमका प्रेमी असाल तर फोटोप्रमाणे खाली पांढरे मोती मध्ये हत्ती आणि वर सुंदर फुल असलेला हा झुमका वापरु शकता.
तुम्हाला प्लेनसाडी आणि मिनिमल लूक करायचा असेल तर हेवी आणि फोटोप्रमाणे हत्तीच्या पॅटर्नसचे हे झुमके वापरु शकता.
सुंदर वर्क केलेले झुमके तुम्ही कोणत्याही ड्रेसवर वापरु शकता. शक्यतो प्लेन ड्रेसवर हे झुमके तुमचा लुक वाढवतील.
सुंदर हत्ती अन् खाली झुमक्याची सुंदर डिझाइन हे कॉम्बिनेशन तुम्हाला कोणत्याही ड्रेसवर मॅच होईल.
नाजुक वर्क पण लांब असे झुमके तुम्ही डेली वेअरसाठी सुद्धा वापरु शकता. त्याने तुमचा लुक मिनीमल दिसेल.
एक गुलाबी रंगाचा डायमंड आणि सुंदर पणतीत वर्क केलेला झुमका तुम्हाला ड्रेसवर नक्कीच मॅच होऊ शकतो.
छत्री आणि हत्ती आणि त्याचा पायाला लहान लहान मोती असे वर्क केलेले झुमके तुम्हाला सहज बाजारात मिळतील.