India : इतिहासाच्या पानांवर चमकणारा गड! 'किल्ल्यांचा रत्न' म्हणून ओळखले जाते 'हे' ठिकाण

Shreya Maskar

किल्ल्यांमधील रत्न

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरचा किल्ला 'किल्ल्यांचे रत्न' (Jewel of Forts) म्हणून ओळखला जातो. ग्वाल्हेरचा किल्ला मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर शहरात गोपाचल नावाच्या एका उंच आणि एकाकी खडकाळ टेकडीवर वसलेला आहे.

Gems in castles | google

ग्वाल्हेरचा किल्ला

ग्वाल्हेरचा किल्ला त्याच्या प्रचंड संरक्षणात्मक सामर्थ्यासाठी, सहाव्या शतकापासूनचा समृद्ध इतिहास आणि मध्ययुगीन स्थापत्यशैलीसाठी प्रसिद्ध आहे. याच वैशिष्ट्यांमुळे त्याला 'भारताचे जिब्राल्टर' असेही म्हटले जाते.

Gwalior Fort | google

किल्ला कधी बांधला?

ग्वाल्हेरच्या किल्ल्याची मूळ स्थापना ८ व्या शतकात (इ.स. ७७३ मध्ये) स्थानिक शासक राजा सूरज सेन यांनी केली होती. तर या किल्ल्याची प्रसिद्ध आधुनिक रचना आणि भव्य राजवाडे प्रामुख्याने तोमर राजपूत शासक राजा मानसिंह तोमर यांनी इ.स. १४८६ ते १५१६ या काळात उभारले.

When was the fort built? | google

ट्रेकिंग

तुम्ही ईशान्येकडील मार्गावरून ट्रेकिंग करत ऐतिहासिक ग्वाल्हेर किल्ल्यापर्यंत जाऊ शकता. या मार्गावर ५०० मीटरची तीव्र चढण आणि अनेक प्राचीन प्रवेशद्वारे आहेत.

Trekking | google

किल्ल्याची रचना

ग्वाल्हेरचा किल्ला 'गोपाचल' किंवा 'गोपागिरी' नावाच्या एका लांब, अरुंद आणि तीव्र उताराच्या, एकाकी खडकाळ टेकडीवर (पठारावर) वसलेला आहे.

Fort structure | google

पर्यटन स्थळे

मध्य प्रदेशला गेल्यावर खजुराहो, ग्वाल्हेर, ओरछा, बांधवगड राष्ट्रीय उद्यान, पचमढी, उज्जैन, इंदूर या ठिकाणांना नक्क भेट द्या.

tourist spots | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : गडप्रेमींसाठी पर्वणी! जुन्नरच्या डोंगररांगांत लपलाय ऐतिहासिक किल्ला, खूप कमी लोकांना माहितेय 'हे' ठिकाण

Pune Fort | AI PHOTO
येथे क्लिक करा...