Manasvi Choudhary
हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्याची सुरूवात करताना श्री गणेशाची पूजा केली जाते.
नवीन घरात प्रवेश करताना गणेशाची पूजा केली जाते यानंतर गृहप्रवेश करतात.
पहिल्यांदा नवीन घरात प्रवेश करताताना शुभ मुहूर्तानुसार गणेश पूजन करण्याची पध्दत जुनी आहे.
घराच्या उंबरठ्याजवळ गणपती, लक्ष्मी आणि सरस्वती यांची पूजा केली जाते.वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी आणि त्यांना घरात प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी पुजा केली जाते.
श्रीगणेशाला चांगल्या कामातील प्रथम देवता मानले जाते.विघ्नहर्ता गणेशा जीवनातील सर्व विघ्न दूर करतो यामुळेच नवीन घरात प्रवेश करताना गणेशपूजन केले जाते.
गणेश पूजन करताना ओम गणेशाय नमः आवाहयामि या मंत्राचा जप केला जातो.