ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
साक्षी चौधरी ही प्रमुखतः दक्षिणात्य (तेलुगू, तमिळ) चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री आहे. तिने अनेक तेलुगू हिट चित्रपटांतून प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे.
अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी साक्षी एक यशस्वी मॉडेल होती. २०११ मध्ये तिने 'Femina Miss India' स्पर्धेत भाग घेतला होता आणि ‘Miss Delhi’ हा किताबही पटकावला होता.
तिने २०१३ मध्ये तेलुगू चित्रपट 'Potugadu' द्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केलं. तिचा हा पहिलाच चित्रपट हिट ठरला आणि तिच्या अभिनयाचं कौतुक झालं.
गोपीचंद पडळकर यांच्या ‘धुमस’ चित्रपटात साक्षी चौधरी मुख्य नायिकेच्या भूमिकेत होती. या चित्रपटातील “मन भरून आलया” या गाण्यात ती पडळकरांसोबत रोमँटिक डान्स करताना दिसते.
साक्षी ही फिटनेस फ्रीक असून सोशल मीडियावर ती अनेकदा वर्कआउट व्हिडीओ, योगा क्लिप्स आणि स्टायलिश फोटो शेअर करत असते.
साक्षीने काही हिंदी चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका केल्या आहेत, पण तिला खरी ओळख दक्षिणेतील सिनेसृष्टीत मिळाली आहे. तिने “James Bond” आणि “Selfie Raja” सारख्या चित्रपटांत काम केलं आहे.
Instagram, Facebook आणि ट्विटरवर तिचं लाखोंचं फॅन फॉलोइंग आहे. तिने ‘मन भरून आलया’ गाण्याचे व्हिडीओ क्लिप्सही अलीकडे शेअर केले होते, जे प्रेक्षकांना खूप आवडले.