Good Cholesterol Foods: शरिरात गुड कोलेस्ट्रॉल वाढवायचंय? आहारात नक्की समाविष्ट करा 'हे' ७ सुपरफूड्स

Shruti Vilas Kadam

ओट्स (Oats)

ओट्समध्ये विद्राव्य फायबर (बीटा-ग्लुकन) भरपूर असते. हे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करण्यास मदत करते आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास हातभार लावते.

Oats | Saam Tv

अक्रोड आणि बदाम

अक्रोड, बदाम आणि इतर सुका मेवा यामध्ये हेल्दी फॅट्स, ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. हे HDL चे प्रमाण सुधारण्यास मदत करतात.

Oats

फॅटी फिश

सॅल्मन, सार्डिन, मॅकरेल यांसारख्या माशांमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड मुबलक असते. हे हृदयाचे आरोग्य जपण्यास आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलला समर्थन देण्यास उपयुक्त ठरते.

fish | yandex

अवोकाडो

अवोकाडोमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स आणि फायबर असते. हे HDL वाढवण्यास आणि LDL कमी करण्यास मदत करू शकते.

Avocado Benefits | yandex

ऑलिव्ह ऑईल

एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईलमध्ये हेल्दी फॅट्स आणि पॉलीफेनॉल्स असतात. स्वयंपाकात मर्यादित प्रमाणात याचा वापर केल्यास हृदयाला फायदा होऊ शकतो.

Olive Oil | yandex

बेरीज

स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, संत्री आणि मोसंबी यांसारख्या फळांमध्ये अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन C आणि फायबर असते. ही फळे कोलेस्ट्रॉल संतुलित ठेवण्यास मदत करतात.

Berries | Canva

कडधान्ये आणि संपूर्ण धान्ये

हरभरा, राजमा, मसूर, मूग तसेच संपूर्ण धान्यांमध्ये फायबर मुबलक असते. नियमित सेवनामुळे कोलेस्ट्रॉलचे संतुलन राखण्यास आणि हृदय निरोगी ठेवण्यास मदत मिळते.

Sprout Bhel | pinterest

Walnut Benefits: रोज सकाळी फक्त ३ अक्रोड खा; शरीर आणि मेंदू राहील निरोगी, मिळतील हे ७ फायदे

Walnut Benefits | Saam Tv
येथे क्लिक करा