Gold Investments : दागिन्यांव्यतिरिक्त सोन्यात गुंतवणुकीचे इतर पर्याय तुम्हाला माहिती असलेच पाहिजेत

प्रविण वाकचौरे

सोने गुंतवणूक

सोन्याची गुंतवणूक हा नेहमीच एक उत्तम पर्याय मानला जातो. सोन्यात गुंतवणूक करण्याचे अनेक मार्ग तुम्ही अवलंबू शकता.

दागिने

सर्वात सोपा पर्याय म्हणजे तु्म्ही दागिने खरेदी करु शकता.

सॉवरेन गोल्ड बॉण्ड

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) सॉवरेन गोल्ड बाँड जारी करते. यातील गुंतवणूक फायदेशीर मानली जाते.

निश्चित परतावा

सॉवरेन गोल्ड बॉण्डमध्ये सोन्याच्या किमती व्यतिरिक्त, दरवर्षी 2.5% चा निश्चित परतावा मिळतो.

डिजिटल सोने

तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर पेमेंट अॅप वापरत असल्यास, तुम्ही डिजिटल गोल्डमध्येही गुंतवणूक करू शकता.

अॅप्स

तुम्ही तुमच्या सोयीनुसार Amazon Pay, Google Pay, Paytm, PhonePe सारख्या प्लॅटफॉर्मवर डिजिटल सोने खरेदी करु शकता.

गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड

शेअर्सप्रमाणे सोने खरेदी करण्याच्या सुविधेला गोल्ड ईटीएफ म्हणतात. ही म्युच्युअल फंड योजना आहे.

स्वस्त पर्याय

सोन्यात गुंतवणूक करण्याचा हा सर्वात स्वस्त पर्याय आहे. हे एक्सचेंज ट्रेडेड फंड आहेत जे स्टॉक एक्सचेंजवर खरेदी आणि विकले जाऊ शकतात.

गोल्ड म्युच्युअल फंड

गोल्ड म्युच्युअल फंड हे ओपन-एंडेड गुंतवणूक प्रोडक्ट आहे, जे गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करतात.

डिमॅट खाते

डिमॅट खात्यातून तुम्ही गोल्ड म्युच्युअल फंडात थेट ऑनलाइन पद्धतीने किंवा वितरकांमार्फत गुंतवणूक करू शकता.

NEXT : कोचिंग क्लासशिवाय IAS कसं बनायचं?