ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे
आज सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे.
माहितीनुसार, आज सोन्याच्या दरात 100 रुपयांनी घट झाली आहे, तर चांदीचे भाव स्थिर आहेत.
आज 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 54,550 रुपये आहे. आदल्या दिवशी म्हणजेच काल हा भाव 54,650 रुपये होता.
चांदीचा दर कालच्या तुलनेत 3,40 प्रति ग्रॅमने घसरला आहे. एक ग्रॅम चांदीची किंमत 72.80 रुपये आहे. तर आठ ग्रॅम चांदीची किंमत 582.40 आहे.
जर तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी करत असाल तर गुणवत्तेकडे कधीही दुर्लक्ष करू नका. हॉलमार्क पाहूनच दागिने खरेदी करा.