Sakshi Sunil Jadhav
उष्णता आणि घामामुळे त्वचा डल आणि काळपट दिसते. यामुळे चेहऱ्यावरची चमक कमी होते आणि तुम्ही थकलेले दिसता.
अनेक जण पार्लरमध्ये हजारो रुपये खर्च करतात. पण त्याचा परिणाम काही दिवसांतच कमी होतो.
घरातील नैसर्गिक घटक त्वचेसाठी सुरक्षित असतात. त्यामुळे साइड इफेक्ट्सचा धोका कमी राहतो.
हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-सेप्टिक गुण असतात. हे पिंपल्स आणि इन्फेक्शन कमी करण्यास मदत करतात.
अॅलोवेरा त्वचेला थंडावा देतो आणि जळजळ कमी करतो. तो स्किनला हायड्रेट ठेवून नैसर्गिक चमक वाढवतो.
बेसनमध्ये 2 चमचे अॅलोवेरा जेल आणि चिमूटभर हळद मिसळा. हे मिश्रण स्मूथ पेस्ट होईपर्यंत चांगले फेटा.
कधीही हा फेसपॅक चेहरा आणि मानेला लावा. पण 15 ते 20 मिनिटांनंतरच थंड पाण्याने स्वच्छ धुवा.
तुम्ही हा पॅक लावलात तर पिगमेंटेशन आणि डार्क स्पॉट्स कमी होतात. सूर्यप्रकाशामुळे झालेली टॅनिंगही हळूहळू कमी होते.
रोजच्या वापरामुळे त्वचा मऊ आणि चमकदार होते. चेहऱ्यावर नैसर्गिक गुलाबी चमक दिसते.