Dhanshri Shintre
सकाळी नाश्ता शरीराला ऊर्जा देतो आणि दिवसभर ताजेतवाने राहण्यासाठी उपयुक्त ठरतो, तसेच थकवाही दूर करतो.
सकाळी नाश्त्यासाठी फक्त कडधान्य न घेता बनवा हेल्दी ब्रेड रोल जे पोटासाठी आणि आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात.
ब्रेड, मोड आलेली कडधान्ये, बटाटा, मसाला पेस्ट, कोथिंबीर, बटर आणि तेल वापरून बनवा टेस्टी ब्रेड रोल मिश्रण.
कडधान्यांचे ब्रेड रोल बनवण्यासाठी सर्वात आधी मोड आलेली मिक्स कडधान्ये कुकरमध्ये शिजवून घ्यावीत.
शिजलेल्या कडधान्यात आले-लसूण-मिरची व बटाट्याची पेस्ट मिसळा आणि त्याचे छोटे छोटे गोळे तयार करा.
ब्रेडच्या कडा काढून टाका आणि उरलेली स्लाइस पोळपाटावर ठेवून सौम्यपणे लाटून पातळ करा.
लाटलेल्या ब्रेडवर एक चमचा कडधान्य मिश्रण ठेवा आणि करंजीसारखे किंवा रोलसारखे नीट गुंडाळून घ्या.
ब्रेडच्या कडा पाणी लावून बंद करा आणि नंतर तयार रोल तव्यावर बटर घालून सोनेरी रंग होईपर्यंत भाजा.
गरमागरम कडधान्यांचे ब्रेड रोल तयार! हवे असल्यास हिरवी चटणी, टोमॅटो सॉस किंवा शेजवान सॉससोबत सर्व्ह करा.