कोमल दामुद्रे
नात्यात प्रेमासोबत भांडण होणे आवश्यक असते असे म्हणतात. मात्र या वादाचे रुपांतर मारामारीत होऊ नये.
भांडणाच्या वेळी बरेचदा लोक एकमेकांना त्या गोष्टी बोलतात, ज्या सामान्यपणे सांगण्यास ते कचरतात
जर तुम्ही विवाहित असाल आणि तुमचे तुमच्या पती किंवा पत्नीशी एखाद्या गोष्टीवरून भांडण झाले असेल.
ज्यामुळे अनेक दिवसांपासून संभाषण थांबले असेल, तर या टिप्स तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.
भांडूण कोणत्याही प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. त्यासाठी आपल्याला पार्टनरचे मतही ऐकून घ्यायला हवे
तुमचे मत मांडायचे असेल तर आधी समोरच्याचे बोलणे ऐका. त्यांना तुम्हाला काय वाटते हे देखील समोरच्याला समजावून सांगा
दोन लोकांमध्ये मतभेद होतात तेव्हा समोरच्या व्यक्तीचा दृष्टिकोन ऐकण्यापेक्षा किंवा स्वीकारण्यापेक्षा त्यांच्या मतांना आव्हान देत तुमचा दृष्टिकोन ठेवणे चांगले.
वाद होत असतानाच लोक छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडायला लागतात. त्यामुळे लहान समस्यांकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करा.
जेव्हा तुमचे आणि पार्टनरचे भांडणे झाले असेल तर ती गोष्ट वेळीच एकमेकांशी बोला. ज्यामुळे वाद लवकर मिटेल.