Shruti Vilas Kadam
अद्रकातील नैसर्गिक घटक पचनक्रियेला मदत करू शकतात. जेवणानंतर होणारी जडपणा आणि अपचनाची समस्या कमी होण्यास काही प्रमाणात मदत होऊ शकते.
अद्रकाचा वापर मळमळ आणि उलट्या होण्याची भावना कमी करण्यासाठी केला जातो. त्यामुळे अद्रकयुक्त दूध आरामदायी पेय ठरू शकते.
कोमट दूध आणि अद्रकामुळे घशाला उब मिळते. सर्दीच्या काळात घशात होणारी खवखव किंवा अस्वस्थता कमी करण्यासाठी हे पेय उपयोगी ठरू शकते.
अद्रकाचा तिखट आणि उष्ण गुणधर्म शरीराला उबदारपणा देण्यास मदत करू शकतो. विशेषतः थंडीच्या दिवसांत कोमट अद्रकाचे दूध आरामदायी वाटू शकते.
अद्रकामध्ये जिंजरॉलसारखे bioactive compounds असतात. त्यांच्यात anti-inflammatory गुणधर्म असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे.
अद्रकामध्ये antioxidant compounds आढळतात, जे शरीरातील oxidative stress विरुद्ध संरक्षण देण्यास मदत करू शकतात.
कोमट दूध अनेकांसाठी आरामदायी असते. त्यात थोडे अद्रक घातल्यास चव आणि उबदारपणा वाढतो, त्यामुळे रात्री हे दूध पिता येते.