Shreya Maskar
'पूर्वेकडील ट्रॉय' म्हणून ओळखला जाणारा जिंजी किल्ला तामिळनाडूच्या विल्लुपुरम जिल्ह्यातील जिंजी शहरात, तिरुवन्नमलाई रोडवर स्थित आहे.
राजगिरी, कृष्णगिरी आणि चंद्रायनदुर्ग या तीन उंच आणि खड्या ग्रॅनाइट टेकड्यांवर वसलेला जिंजी किल्ला चेन्नईपासून नैऋत्येला सुमारे १६० किमी अंतरावर आहे.
जिंजी किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘भारतातील सर्वात अभेद्य किल्ला’ म्हटले होते, तर ब्रिटिशांनी त्याला ‘पूर्वेकडील ट्रॉय’असे संबोधले होते.
जिंजी किल्ल्यात ७ मजली 'कल्याण महाल', गुप्त निसटण्याचे मार्ग आणि संरक्षणासाठीची एक विशाल खंदक प्रणाली आहे.
मराठ्यांकडून हा किल्ला जिंकण्यासाठी मुघलांनी सात ते आठ वर्षे (१६९१-१६९८) वेढा घातला होता. भारतीय इतिहासातील सर्वात प्रदीर्घ लष्करी वेढ्यांपैकी हा एक मानला जातो.
जिंजीच्या लोककथांचा संबंध १८ व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील या प्रदेशाचे स्वतंत्र राजपूत शासक 'राजा देसिंग' यांच्याशी घट्ट जोडलेला आहे. त्यांची अखेरची झुंज तामिळ लोककथांमध्ये अत्यंत शौर्यपूर्ण आणि अविस्मरणीय मानली जाते.
जिंजी किल्ला 'मराठा लष्करी लँडस्केप्स' या नामांकनांतर्गत युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या संभाव्य यादीत समाविष्ट आहे.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.