मराठा स्वराज्याची तिसरी राजधानी कोणती? जेथे १२ शासकांचं होतं राज्य

Bharat Jadhav

स्वराज्याची तिसरी राजधानी

उत्तर भारतातील प्रमुख किल्ल्यांबद्दल आपण वाचले आणि ऐकले असेल. पण दक्षिण भारतातील किल्ल्यांबद्दलचा इतिहास माहितीये का?

मुघलांचा आठ वर्ष संघर्ष

दक्षिण भारतातील हा किल्ला जिंकण्यासाठी मुघलांना आठ वर्षे लागली असं सांगण्यात येतं. किल्ला जिंकण्यासाठी त्यांना बराच काळ किल्ल्याला वेढा घालावा लागला होता.

जिंजीचा किल्ला

तमिळनाडू राज्यातील एक किल्ला आहे. ह्या किल्ल्याला राजगड आणि रायगडनंतर स्वराज्याची तिसरी राजधानी म्हणून ओळखतात. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर छत्रपती राजाराम महाराजांनी जिंजीच्या मदतीने हिंदवी स्वराज्याची पुनः प्रतिष्ठापना केली होती.

तीन टेकड्यावर किल्ला बांधलाय

तामिळनाडू राज्याच्या दक्षिण अर्काट जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे इतिहास प्रसिद्ध ठिकाण आहे. राजगिरी, कृष्णगिरी व चंदरायदुर्ग अशा तीन टेकड्यांवर मिळून हा बांधलेला आहे.

राजगिरी टेकडी

यातील एक राजगिरी टेकडी आहे जी सर्वात उंच आहे. त्यावर चढणे खूप कठीण आहे. म्हणूनच किल्ल्याचा राजा येथे राहत असायचा. टेकडीवर पोहोचण्यासाठी एक लाकडी पूल वापरला जात असायाचा. जो युद्धाच्या वेळी काढून टाकण्यात आला.

कृष्णगिरी टेकडी

ही उत्तरेकडील टेकडी असून यावरील किल्ल्यात राणी राहत असायची. चंदरायदुर्ग ही आग्नेय दिशेतील तिसरी टेकडी आहे, जी प्रामुख्याने लष्करी छावणी आणि टेहळणी मनोऱ्यांसाठी होती.

एक किल्ला बारा शासक

या किल्ल्यांना इसवी सन पूर्व २०० पासून इतिहास आहे. तो खालीलप्रमाणे आहे.जैन वस्त्या,पल्लव राजे,चोल राजे, पांडियन, कोन राजे, होयसाळ, कुरुंब, विजयनगरचे नायक, आदिलशाही,छत्रपती शिवाजी महाराज-२० मे १६७७, छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज यांचे शासन होते.

शेवटी ब्रिटिशांनी केलं राज्य

मुघलांनंतर तेज सिंग यांच्यासह कर्नाटकाच्या नवाबांनी या किल्ल्यावर राज्य केले. त्यांच्यापाठोपाठ फ्रेंच आणि शेवटी ब्रिटिशांनी राज्य केले.

हेही वाचा

येथे क्लिक करा

Devgiri Fort: ७५० पायऱ्या अन् मगरींचा पहारा; महाराष्ट्रातील ७ आश्चर्यांपैकी एक आहे हा किल्ला