Shreya Maskar
जिंजी किल्ला हा भारतातील तामिळनाडू राज्यातील विल्लुपुरम जिल्ह्यात वसलेला आहे. हा १२ व्या शतकातील डोंगरावरील एक विशाल आणि भव्य किल्ला आहे.
जिंजी किल्ला राजगिरी, कृष्णगिरी आणि चंद्रायनदुर्ग या तीन उंच टेकड्यांवर पसरलेला असून, ११ चौरस किलोमीटरचा परिसर व्यापणाऱ्या जाड ग्रॅनाइटच्या भिंतींनी या टेकड्या एकमेकींशी जोडलेल्या आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांनी याला 'भारतातील सर्वात अभेद्य किल्ला' असे संबोधले होते, तर ब्रिटिशांनी याला 'पूर्वेकडील ट्रॉय' असे नाव दिले होते.
जिंजी किल्ल्यात सात मजली कल्याण महाल, धान्य कोठारे, मंदिरे, लष्करी व्यायामशाळा आणि हत्तींसाठीचा एक मोठा हौद यांचा समावेश आहे.
जिंजी किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ८०० फूट (२४० मीटर) उंचीवर स्थित आहे. किल्ल्यावरून निसर्गाचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.
जिंजी किल्ला ८०० वर्षांहून अधिक जुना आहे. याची सुरुवातीची पायाभरणी साधारणपणे ११९० ईसवी सन काळात 'कोन' राजवंशाने केली होती, तर याच्या अस्तित्वाचे मूळ ९ व्या शतकातील चोल राजवंशापर्यंत मागे जाते.
जिंजी किल्ला मूळतः ११९० ते १२०० ईसवी सन दरम्यान 'कोनार' राजवंशातील आनंद कोन यांनी बांधला होता. जिंजी किल्ला युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे.
जिंजी किल्ला हा लष्करी स्थापत्यशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे. आयुष्यात एकदा हा किल्ला नक्की पाहायला जा.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.