Gharge Recipe: सणासुदीला घरी येणाऱ्या पाहुण्यासाठी झटपट बनवा स्वादिष्ट घारगे, वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य तयार करा

गव्हाचे पीठ, गूळ (चिकट नसलेला), बडीशेप, चिमूटभर मीठ, पाणी आणि तळण्यासाठी तेल घ्या.

gharge recipe

गूळ विरघळवा

गूळ कोमट पाण्यात पूर्णपणे विरघळवून गाळून घ्या, जेणेकरून कचरा राहणार नाही.

gharge recipe

पीठ मळणे

गव्हाच्या पिठात बडीशेप, मीठ घालून त्यात गुळाचे पाणी हळूहळू मिसळा आणि मऊ, चिकटसर पीठ मळा.

gharge recipe

पीठ झाकून ठेवणे

मळलेले पीठ किमान २ ते ३ तास झाकून ठेवा. यामुळे घारगे मऊ आणि फुलके होतात.

gharge recipe

घारग्यांना आकार द्या

तेल लावलेल्या हाताने लहान गोळे घ्या आणि मधोमध छिद्र पाडून घारग्याचा आकार द्या.

gharge recipe

तळण्याची योग्य पद्धत

कढईत मध्यम आचेवर तेल गरम करा. घारगे मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळा.

gharge recipe

सर्व्ह करण्याची पद्धत

गरमागरम घारगे दूध, तूप किंवा चहासोबत सर्व्ह करा. थंड झाल्यावरही ते मऊच राहतात.

gharge recipe

Eyelash care: मस्कारा न वापरता नॅचरली लांब आणि जाड पापण्या हव्यात? मग करा 2 मिनिटांचा हा घरगुती उपाय

Eyelash care
येथे क्लिक करा