साम टिव्ही ब्युरो
मालिका आणि चित्रपटांत वैविध्यपूर्ण भूमिका साकारत अभिनेत्री दीप्ती देवीनं तिची ओळख निर्माण केली.
'नाळ', 'घर बंदूक बिरयानी' या अलीकडच्या चित्रपटातल्या दीप्तीच्या अभिनयाचं कौतुक झालं.
त्यापूर्वी ती 'पेज ४', 'अंतरपाट', 'इंदोरी इश्क',अशा चित्रपट आणि मालिकांमध्ये झळकली.
इतकी वर्ष काम केल्यावरही काम मिळवण्याच्या संघषांपासून ग्रुपिझमपर्यंत सगळ्या आव्हानांसाठी आपण सज्ज असल्याचं ती सांगते.
आतापर्यंत तिनं विविध विषयांवर मोकळेपणानं तिची मतं मांडली आहेत.
दीप्ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते.
ती नेहमी आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
अलीकडेच तिने तिचा एक बिनधास्त फोटो शेअर केला आहे.