ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाळ्यात सगळीकडे पाणी साचल्याने मच्छर आणि माश्यांची पैदास होते.
पावसाळ्यात माशा घरात येऊन घोंगावतात.
माश्यांपासून सुटका मिळवण्यासाठी या घरगुती उपायांचा वापर करा.
घरात कापूर असल्यास रोज संध्याकाळी धूपासोबत कापूर लावा. यामुळे माश्या घरात येणार नाही किंवा घरातील माश्या बाहेर जातील.
लिंबाच्या उग्र गंधामुळे माश्या घरात शिरत नाहीत. यासाठी लिंबूचे 2 तुकडे करा, त्यात 6 ते 7 लवंगा ठेवा घरात माश्या येणार नाही.
घरात तुळस, पुदीना आणि लॅव्हेंडर हे झाडे लावा. या झाडांमधील गुणधर्मांमुळे घरात माश्या शिरत नाही.
अस्वच्छ ठिकाणी माझ्या जास्त भिरभिरतात, स्वयंपाकघर, नियमितपणे स्वच्छ ठेवा.