Sakshi Sunil Jadhav
सध्या फिटनेसचा ट्रेंड सुरु आहे आणि याबद्दल अनेकांना संपूर्ण माहिती नसते. काहींना वाटतं की, प्रोटीन मिळवण्यासाठी महागड्या गोळ्या खातात, प्रोटीन पावडर आणि ना ना प्रकारचे महागडे पदार्थ खातात.
पुढे आपण घरच्या थाळीमधून दिवसाला ५० ग्रॅम प्रोटीन कसं मिळतं. त्यात कोणत्या पदार्थांचा समावेश होतो हे जाणून घेणार आहोत.
प्रोटीन स्नायूंची वाढ, तुमच्या शरीराची संपूर्ण प्रक्रिया आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी प्रोटीन तुमच्या आहारात असणं गरजेचं आहे.
तज्ज्ञांच्या मते ६० किलो वजनाच्या व्यक्तीला दिवसाला ५० ते ६० ग्रॅम प्रोटीनची गरज असते. त्यासाठी पुढील कॉम्बो बेस्ट ठरतील.
२०० ग्रॅम पनीर आणि एक मोठी वाटी डाळ यामधून ५० ग्रॅमपेक्षा जास्त प्रोटीन मिळू शकतं.
१०० ग्रॅम ड्राय सोया चंक्समध्ये अंदाजे ५२ ग्रॅम प्रोटीन असतं. त्यामुळे हा सर्वात स्वस्त आणि बेस्ट ऑप्शन मानला जातो.
राजमा आणि पनीरचं कॉम्बिनेशन हे चविला उत्तम असतं. एका वेळेसच्या जेवणातून ५० ग्रॅमपेक्षा जास्त प्रोटीन तुम्हाला यातून मिळेल.
क्विनोआ, काळे चणे आणि दही हे तीन पदार्थ एकत्र खाल्ल्यावर ४० ते ५० ग्रॅम प्रोटीन सहज मिळतं.
4 अंडी, 2 मूग डाळ चिल्ले आणि ताक यांचं कॉम्बिनेशन प्रोटीनसाठी चांगला पर्याय आहे.