Dhanshri Shintre
तुरुंगातून कैदी पळणे हा गंभीर गुन्हा मानला जातो आणि यासाठी संबंधितांना कायद्याने कठोर शिक्षा केली जाते.
भारतामध्ये जर एखादा कैदी तुरुंगातून पळून गेला, तर आयपीसी कलम २२४ अंतर्गत त्याला ७ वर्षांपर्यंत तुरुंगवासासह दंडाची शिक्षा होऊ शकते.
भारतामध्ये तुरुंगातून पळणे हा अजामीनपात्र गुन्हा मानला जातो आणि जर कैद्याने पळताना हिंसाचार किंवा बळाचा वापर केला, तर शिक्षा अधिक कठोर ठरते.
तुम्हाला माहिती आहे का की काही देशांमध्ये तुरुंगातून पळणे गुन्हा मानले जात नाही? चला, आपण जाणून घेऊया त्या देशांची माहिती.
जर्मनीमध्ये कैदींचे तुरुंगातून पळणे गुन्हा मानले जात नाही, त्यामुळे असे प्रकरण घडल्यास त्यांना शिक्षा होत नाही.
जर्मनीमध्ये मानवी हक्कांचा सन्मान केला जातो, त्यामुळे कैदी तुरुंगातून पळल्यास त्याला गुन्हा मानून शिक्षा दिली जात नाही.
जर कैद्याने तुरुंगातून पळताना काही गुन्हा केला, तर त्याच्याविरुद्ध स्वतंत्र खटला दाखल करून कारवाई केली जाते.
जर कैद्याने तुरुंगातून पळताना मालमत्ता नष्ट केली किंवा कोणावर हल्ला केला, तर त्याला गुन्हेगार म्हणून कारवाई केली जाते.