Surabhi Jayashree Jagdish
तिरंग्याला तीन रंग असतात - वरच्या बाजूला भगवा, मध्यभागी पांढरा आणि तळाशी हिरवा.
भगवा रंग धैर्य आणि त्यागाचं प्रतीक आहे. पांढरा रंग शांतता आणि सत्याचे प्रतीक आहे. तर हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक मानला जातो.
भारताच्या तिरंगा ध्वजाची रचना कोणी केली हे तुम्हाला माहीत आहे का?
भारताचा सध्याचा राष्ट्रध्वज पिंगली व्यंकय्या यांनी १९२१ मध्ये बनवलेल्या डिझाईनवर आधारित आहे.
हा ध्वज 22 जुलै 1947 रोजी भारतीय संविधान सभेने स्वीकारला होता. पिंगली हे स्वतः भारतीय स्वातंत्र्यसैनिक होते.
कोलकात्यातील पारसी बागान चौकमध्ये भारताचा पहिला राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. ते स्वदेशी चळवळीचे प्रतीक होते.